मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनःमुख्य शासकीय सोहळा सिद्धार्थ उद्यान येथे
बुधवारी (दि.१७);मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय सोहळा बुधवार दि.१७ रोजी सकाळी ९ वा. सिद्धार्थ उद्यान येथील स्मृतिस्तंभाजवळ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना देतील. स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, त्यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार, नागरिक आदींनी या सोहळ्यास उपस्थित रहावे,सए आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
