मराठवाडा पदवीधर नोंदणी अभियान संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय खंबायते यांच्या हस्ते
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ मराठवाडा पदवीधर नोंदणी अभियान संपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले वाळुज येथे मोठ्या प्रमाणात पदवीधरांची नोंदणी करण्याच्या दृष्टीने आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मराठवाडा पदवीधर नोंदणी अभियान संपर्क आल्याचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी रिबीन कापून केले त्यावेळी भाजपा जिल्हा महामंत्रीसौ ज्योतिताई गायकवाड, ओबीसी मोर्चा सरचिटणीस धोंडीराम होले पाटील, तालुका सरचिटणीस सचिन मुंडे, उपाध्यक्ष जनार्धन चनघटे बाबासाहेब शिंदे पाटील, नामदेव इले पाटील, शहराध्यक्ष रवी मनगटे ,शिक्षक आघाडीचे ता संयोजक चेतन बोरोले,धीरज साकला, योगेश नाडे आदि मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी सुमारे ४५ पदेधारांचे फॉर्म भरून घेण्यात आले तसेच परिसरातील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी व लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री अविनाश गायकवाड यांनी मानले. त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी २००० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला.