Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादमराठा सेवा संघ "जय जिजाऊ " रथ यात्रेचे पैठण मध्ये जंगी स्वागत

मराठा सेवा संघ “जय जिजाऊ ” रथ यात्रेचे पैठण मध्ये जंगी स्वागत

मराठा सेवा संघ “जय जिजाऊ ” रथ यात्रेचे पैठण मध्ये जंगी स्वागत

आत्ताच एक्सप्रेस
पैठण/विशेष प्रतिनिधी /मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात फिरत असलेल्या जिजाऊ रथयात्रेचे पैठणमध्ये जंगी स्वागत व मोठ्या उत्साहात शोभा यात्रा संपन्न.   जिजाऊ रथयात्रा द्वारे मराठा जोडो अभियान दि. 18 मार्च 2025 पासून निघालेली जिजाऊ रथ यात्रेचे दि. 30 मार्च रोजी पैठण मध्ये मोठ्या उत्साहात आगमन झाले होते दि. 30 व 31 मार्च पैठण ला मुक्काम होता. आज दि. 1 एप्रिल रोजी जिजाऊ रथयात्रेची शोभायात्रा पैठणमध्ये सकाळी 8-00 वाजता खंडोबा चौक, येथुन निघून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज या महामानावांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली व छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ रथयात्रेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत व मनोगतव रथयात्रेचा उद्देश उपस्थित त्यांना संबोधित करण्यात आले व यानंतर जिजाऊ रथयात्रा पैठण येथुन ढोरकीन, बिडकीन, चित्तेगांव मार्गे छत्रपतीसंभाजी नगरला रवाना झाली आहे. या रथयात्रेमध्ये पैठण मधील , शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता तसेच वारकरी संप्रदायाचे बाल वारकरी देखील या सहभागी झाले होते पैठण मधील बहुजन व शिवप्रेमीं मी या रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष विजय काकडे माजी तालुकाध्यक्ष दशरथ खराद, अरुण गोरडे सर संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश्वर जाधव मराठी सेवा संघाचे ज्येष्ठ सदस्य अशोक भागवत दादासाहेब पठाडे असले सर शंकर सपकाळ सह सोमनाथ परदेशी किशोर तावरे ज्ञानेश्वर वाडेकर उबेद सर संतोष रोडे संतोष गव्हाणे कल्याण भुकेले सुरेश धारगड नवथर सर साईनाथ कर्डिले ज्ञानेश्वर जाधव इत्यादींचा प्रामुख्याने यामध्ये सहभाग होता या शोभा यात्रेमध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रशाला पैठण श्रीनाथ हायस्कूल पैठण शालिवाहन विद्यालय पैठण प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण मधील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या शोभायात्राची शोभा वाढवली होती
सदरील जिजाऊ शोभायात्रा यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष विजय काकडे माजी तालुकाध्यक्ष दशरथ खराद, अरुण गोर्डे, अशोक भागवत दादासाहेब पठाडे फसले सर नवथर सर मिटकर सर आदींनी परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments