मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी रास्ता रोको आंदोलन
खुलताबाद/प्रतिनिधी/ मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनासाठी खुलताबाद मराठा समाज बांधवांच्या वतीने सोमवार (ता. एक) रोजी खुलताबाद -फुलंब्री महामार्गावर सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन रविवारी (ता. ३१) खुलताबाद पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना देण्यात आले आहे. या आंदोलनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
