मंथन परीक्षेत आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिराचे यश
पैठण /प्रतिनिधी/
स्पर्धा परीक्षेतील अखंड यशाची परंपरा आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिराने कायम ठेवत याही वर्षी मंथन जनरल नॉलेज एक्झाम मध्ये एकूण 13 विद्यार्थ्यांनी केंद्र पातळीवर बाजी मारली.
यामध्ये यशस्वी झालेला तनुज उबाळे(1ली) , माधव गवाड, स्वरा धायतडक ,साईराज धोकटे(2री),अथर्व दूधभाते,तेजस्विनी उबाळे(3री),सार्थक फटांगडे, शिवेंद्र काकडे ,ओम नवले (5वी),सोहम देशपांडे ,अमान सय्यद( 6वी),समर्थ मिसाळ, समर्थ वाघमारे(7वी) असे या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे,मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचेअभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य(कार्यवाह,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई ), डॉ. जयंत जोशी ( विद्यासभा अध्यक्ष),विजयराव चाटुपळे( सदस्य,भा. शि.प्र.संस्था, अंबाजोगाई), डॉ. पद्मकुमार कासलीवाल, जुगलकिशोर लोहिया, शिवाजी मारवाडी, नंदकिशोर मालाणी, डॉ. राम लोंढे, मनोज शुक्ल,किशोर भाकरे,संजय पापडीवाल,रविंद्र साळजोशी,प्रा.विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी,माध्य.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती जोशी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.