जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश
छत्रपती संभाजीनगर – आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि. २९ डिसेंबर पर्यंत हे आदेश अमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
