Sunday, March 29, 2026
Homeऔरंगाबादमनसे नेते मा.आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर  यांची जालना जिल्हा संपर्क अध्यक्षपदी नियुक्ती; जालना...

मनसे नेते मा.आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर  यांची जालना जिल्हा संपर्क अध्यक्षपदी नियुक्ती; जालना जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह

मनसे नेते मा.आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर  यांची जालना जिल्हा संपर्क अध्यक्षपदी नियुक्ती; जालना जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह

जालना/प्रतिनिधी/ जालना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल करण्यात आले असून,पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर साहेब यांची जालना जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ॲड.जयप्रकाश बाविस्कर हे राजसाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.त्यांच्याकडे पक्ष संघटनेचा दांडगा अनुभव असून एक उत्तम संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते सक्रिय असून पक्षाच्या विविध आंदोलनांत आणि संघटनात्मक बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.बाविस्कर यांच्या नियुक्तीची बातमी समजताच जालना जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले असून,त्यांच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात जालना जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी होईल,अशी भावना व्यक्त केली जात आहे.अनुभवी नेतृत्व:माजी आमदार म्हणून बाविस्कर यांना प्रशासकीय आणि राजकीय कार्याचा मोठा अनुभव आहे. राजसाहेबांच्या अत्यंत जवळचे आणि निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख आहे.जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात मनसेचे जाळे विस्तारण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.या नियुक्तीमुळे जालना जिल्ह्यातील तसेच जाफ्राबाद,घनसावंगी  तालुक्यात मनसेला नवी उभारी मिळणार असून,आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.या निवडीचे स्वागत घनसावंगी तालुका अध्यक्ष गोवर्धन ढेरे व जाफ्राबाद तालुका सरचिटणीस  पंढरीनाथ पाटील म्हस्के व मनसे पदाधिकारी यानी केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments