माजी विद्यार्थी अक्षय चव्हाण यांचा कन्नड महाविद्यालयात सत्कार
कन्नड तालुका /प्रतिनिधी/ कन्नड येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलीटेक्निक) येथे  नुकताच बृहन्मुंबई महानगर पालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर नियुक्त झालेल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री अक्षय मनोहर चव्हाण यांचा सत्कार व  अभिनंदनपर कार्यक्रम पार पडला.यावेळी सदर विद्यार्थ्याचे सर्व उपस्थित विद्यार्थ्यांसमक्ष उपप्राचार्य प्रा संतोष मतसागर व सर्व विभाग प्रमुखांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अक्षय चव्हाण हे चिकलठाण गावचे असून त्यांनी  महाविद्यालयात यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल) थेट द्वितीय वर्षासाठी  प्रवेश घेऊन  २०१७ ला पदविका अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यानंतर शिक्षणाची कास न सोडता त्यानी याच शाखेत आपली पदवी सुद्धा पूर्ण केली. कोरोना आजाराचे वेळी पितृछत्र हरपल्याने समोर आलेल्या भीषण परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही व  तो  पर्याय फक्त अभ्यासातूनच साकार होऊ शकतो हे जाणून स्पर्धात्मक परीक्षेकडे वळत नियमित अभ्यास, अद्ययावत ज्ञानसाठा संवर्धन व अभियांत्रिकी महाविद्यालयातून मिळालेले अद्ययावत सामान्य तसेच तांत्रिक ज्ञान याचे जोरावर मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर आपली नेमणूक निश्चित केली. आपल्या सत्काराला उत्तर देताना श्री अक्षय चव्हाण यांनी  ” अभियांत्रिकी शाखा स्पर्धात्मक परीक्षांसाठी पायाभूत शाखा असून अद्ययावत व तंत्रशुद्ध ज्ञानाच्या जोरावर या शाखेने आपले वर्चस्व व महत्त्व सिद्ध केलेले आहे व माझी मूळ जडणघडण ही या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर झाली ” असे प्रतिपादन केले व महाविद्यालय प्रशासन व व्यवस्थापनाचे आभार मानले.आपल्या प्रमुख भाषणात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संतोष मतसागर यांनी ” आजपर्यंत आमच्या महाविद्यालयातील अकराशे   विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व  बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वतःला सिद्ध केले त्यापैकी काही विद्यार्थी हे प्रदेशात कार्यरत असून शासकीय सेवेत सुद्धा तब्बल पंचवीस विद्यार्थी कार्यरत आहे व शासकीय सेवेत या विद्यार्थ्याने आपले नाव नोंदवत आम्हास अभिनंदन व पर्यायाने अभिमानाचा क्षण प्राप्त करून दिला त्याबद्दल महाविद्यालय संबंधीत सर्व घटक समाधानी असून त्यातून अजून ऊर्जा मिळून कामाचा वेग आणि व्याप्ती विस्तारत आहे” असे गौरवोद्गार काढले.सदर विद्यार्थ्याचे  विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. किशोर पाटील साहेब, सरचिटणीस मा. प्रसन्ना पाटील सर, संचालक मा. विश्वासबापू मोतींगे, मा. सिद्धार्थ पाटील सर, प्राचार्य डॉ. अजीत चौधरी, उपप्राचार्य प्रा.संतोष मतसागर, विभागप्रमुख प्रा. श्रीराम काळे, प्रा.सोनाली गोरखा, प्रा. महेंद्र राजपूत प्रा. नवनाथ चव्हाण,  प्रा. प्रमोद गडपायले, प्रा. इकराम पठाण यांनी अभिनंदन केले.