Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादमाजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक साठी पदभरती

माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक साठी पदभरती

माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक साठी पदभरती

छत्रपती संभाजीनगर – सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (गट-क) या पदांच्या भरतीसाठी एकूण 72 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या माजी सैनिकांसह, सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार युद्धकाळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत्यू झालेल्या किंवा अपंगत्व येऊन सेवेस अयोग्य ठरलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एक पात्र व्यक्तीस, पसंतीक्रमानुसार निवड करण्यात येणार आहे.

72 पदांपैकी 3 पदे किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असून, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदाऱ्यांचा विचार करून गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरती करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन (TCS-ION) यांच्या मार्फत राबविण्यात येणार असून, परीक्षेसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पात्र उमेदवारांनी वेब-आधारित ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments