Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादमाजी मंत्री, आमदार मा.राजेंद्र गावीत यांच्या उपस्थितीत पालघर शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

माजी मंत्री, आमदार मा.राजेंद्र गावीत यांच्या उपस्थितीत पालघर शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

माजी मंत्री, आमदार मा.राजेंद्र गावीत यांच्या उपस्थितीत पालघर शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

देगलूर/प्रतिनिधी/ ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन पालघर विभागीय शाखेचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, माजी खासदार तसेच विद्यमान आमदार मा.राजेंद्र गावीत यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे सर्कल सेक्रेटरी मा.जयराम जाधव हे आवर्जून उपस्थित होते. तसेच आयपी.आरती खाडे यांची विशेष उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित कामगारांना संबोधित करत असताना मा.गावीत साहेब यांनी टपाल खात्यातील मागासवर्गीय कर्मचारी एससी/ एसटी असोसिएशन च्या माध्यमातून आपल्या हक्क आणि अधिकारासाठी एकत्र येऊन लढताहेत ही काळाची गरज आहे. भविष्यातील लढाई खूप अवघड आहे त्यामुळे आपण आपली एकजुट अशीच ठेवा. अनेक बाबतीत निर्णय घेताना आम्हाला मर्यादा येतात पण समाजाची एकजुट हीच आपली ताकद आहे.
सर्कल सेक्रेटरी जयराम जाधव यांनी एससी/एसटी असोसिएशन महत्व अधोरेखित करत असताना विस्तृतपणे एससी/एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या वरील अन्याय अत्याचार होत असताना चॅनल चा कसा उपयोग करायचा हे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.तानाजी माने हे होते. प्रास्ताविक प्रविण शिंदे यांनी केले.
महाराष्ट्रातील असोसिएशन च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती या मध्ये सर्वश्री.
पिराजी सदावर्ते(रिजनल सेक्रेटरी,मुंबई),संजय जाधव (रिजनल सेक्रेटरी, नवी मुंबई),चंद्रकांत वाघमारे (रिजनल सेक्रेटरी, पुणे),तानाजी कांबळे ( सर्कल उपाध्यक्ष),संदीप जटाळे(असि.स सेक्रेटरी),सुरेश रोडेवाड(सर्कल असि.खजिनदार),प्रतीक दाभाडे,अर्जुन भोसले, संदीप पांचाळ, अनिल लोखंडे, इत्यादी उपस्थित होते.
सूत्र संचालन स्वाती शिरसाट यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय चाबुकस्वार, भावेश गायकवाड,प्रतीक गायकवाड, आयु.उके यांनी विशेष परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments