Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादजागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

“जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथेच खऱ्या अर्थाने राष्ट्राचा विकास होतो!”
आजची स्त्री ही घरापुरती मर्यादित नसून अंतराळापासून ते उद्योगजगतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवत आहे. महिलांच्या या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो.
स्त्रियांच्या स्वातंत्र्य, हक्कांसाठी आणि समानतेसाठी केलेल्या लढ्यांच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. आजच्या युगात स्त्रिया फक्त घरापुरत्याच मर्यादित नसून शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव जगाला करून देत आहेत.
परंतु आजही अनेक ठिकाणी महिलांना समान संधी मिळत नाहीत. हिंसा आणि अत्याचारासारख्या समस्या समोर येत आहेत. आपल्याला खरे समतोल समाज घडवायचा असेल तर मुलगा-मुलगी भेदभाव न करता महिलांना योग्य सन्मान देणे गरजेचे आहे. तिथेच खऱ्या अर्थाने स्त्रीचा विकास होईल.
“नव निर्मितीची संकल्पना घेऊ या, रचना नवं कलाकृती करू या.
एक दिवस तरी स्त्रीच्या अस्तित्वासाठी साजरा करू या… अशी माहिती  समाजसेविका
 रचना पहाडे जैन यानी दिली.
– रचना पहाडे जैन      
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments