महावितरणच्या पाणपोईचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या सिडको एन-4 येथील शासकीय निवासस्थानासमोर पाणपोई सुरू करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवारी (30 मार्च) सकाळी मुख्य अभियंता कछोट यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
उन्हाळ्यात वाटसरूंची तहान भागावी या हेतूने सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्य अभियंता कछोट यांच्या सुविद्य पत्नी निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ.योगिता कछोट यांच्या संकल्पनेतून ही पाणपोई सुरू करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश झांबड, विलासचंद्र काबरा, मनोज बोरा, हरिश्चंद्र सोनी, प्रतीक शिरसे, भगवान दौड, महावितरणचे अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, संदीप दरवडे, वरिष्ठ व्यवस्थापक लक्ष्मीकांत राजेल्ली, कार्यकारी अभियंता महेश पाटील, जयंत खिरकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिनकर डुमणे, दीपक माने, विश्वनाथ लहाने, सहायक अभियंता राजेंद्र राठोड, सचिन लालसरे, अविनाश चव्हाण, विजय काथार, सम्यक कछोट, संयम कछोट यांची उपस्थिती होती.
