महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांनी मुस्लिम समाजाच्या वेशभूषाविषयी मोबाईल वर स्टेटस ठेवून भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाज आक्रमक
मुस्लिम समाजासह सर्व धर्मगुरू ही आक्रमक!; महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे-मुस्लिम समाज बांधवांची मागणी
केज/प्रतिनिधी/ केज येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांनी मुस्लिम समाजाच्या वेशभूषाविषयी स्वतःच्या मोबाईल वर स्टेटस ठेवून भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे,मुस्लिम समाजासह सर्व धर्मगुरू ही आक्रमक झालेले आहेत. महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आमदार नमिताताई मुंदडा,उपअभियंता केज, तहसीलदार केज, पोलीस ठाणे केज यांच्याकडे मुस्लिम समाज बांधवास सह धर्मगुरूंनी केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,*”गोल टोपी”* ही मुस्लिम समाज बांधवांची अस्मिता आहे, परंतु महावितरण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल सय्यद मॅडम यांनी त्यांच्या स्वतःच्या मोबाईल व्हाट्सअप स्टेटसला टोपीचा नाम उल्लेख करून त्यांनी स्वतःच्या स्टेटसला सदर मजकूर व्हायरल करून मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत व आमची अस्मिता असलेली *” गोल टोपीचा”* जाणीवपूर्वक अवमान केला आहे. महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सय्यद मॅडम यांना आमच्या समाजाच्या टोपीची एलर्जी आहे का? केज शहरात गेल्या दीड महिन्यापासून वसुलीच्या नावाखाली वीज ग्राहकांना वेठीस धरून अरेरावीची भाषा बोलणाऱ्या सय्यद मॅडम यांना ग्राहकांच्या वैयक्तिक राहणीमानावर टिपा टिपणी करण्याचा अधिकार आहे का? मुस्लिम समाजातील एका ग्राहकावर वीज चोरीचा आरोप करत *”टोपीवाला पत्रकार”* वीज चोर, कोण आहे नाव मेसेज करा अशा आशयाचे व्हाट्सअप स्टेटस वर मजकूर ठेवून मुस्लिम समाजाला जाणून बुजून बदनाम करण्याचे षडयंत्र अभियंता मॅडम करत आहेत.
महावितरण ने ज्या कामासाठी नियुक्त केले आहे त्यांनी तेच काम करावे इतरांच्या जाती धर्माबद्दल किंवा पेहराव्या बद्दल बोलू नये अन्यथा समाज बांधव रस्त्यावर उतरून त्यांना जाब विचारतील. समाजामध्ये दोष व जातीय दोष निर्माण करून समाजाच्या भावना दुखावणाऱ्या कनिष्ठ अभियंता सय्यद मॅडम यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे अन्यथा त्यांची बदली करण्यात यावी. अन्यथा धर्मगुरूच्या व समाज बांधवांच्या वतीने सदर प्रकरणी तीव्र स्वरूपाचे येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करण्यात येईल. महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सय्यद मॅडम यांनी टेटसला ठेवलेला मजकूर हा निंदनीय आहे त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांमध्ये दोष निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास यास कनिष्ठ अभियंता श्रीमती शीतल सय्यद मॅडम जबाबदार राहतील. मस्तवलेल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्या अभियंत्यावर तात्काळ करावी करून निलंबित करावे व त्यांची बदली करण्यात यावी कारण अशा मगरू अधिकाऱ्यामुळे महावितरणची बदनामी होत आहे. सर्व मुस्लिम समाज बांधव हे कनिष्ठ अभियंता सय्यद मॅडम यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी करत आहे अन्यथा पुढील काळात आंदोलन करून रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये अशा आशयाचे लेखी निवेदन खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आमदार नमिताताई मुंदडा, उप अभियंता, महावितरण कार्यालय केज, तहसीलदार केज, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे केज यांना दिले आहे. या लेखी निवेदनावर मुस्लिम समाज बांधवासह धर्मगुरूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.