Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादमहावीर जयंतीनिमित्त वेरूळ येथील कीर्ती स्तंभाची स्वच्छता

महावीर जयंतीनिमित्त वेरूळ येथील कीर्ती स्तंभाची स्वच्छता

महावीर जयंतीनिमित्त वेरूळ येथील कीर्ती स्तंभाची स्वच्छता

खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील भगवान महावीर कीर्ती स्तंभ परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.१ एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या महावीर जयंतीचे औचित्य साधून दिगंबर जैन गुरुकुल संस्था आणि सकल जैन समाज, वेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेवाकार्य पार पडले.​दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी जैन समाजाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून सोमवारी संध्याकाळी सहा  वाजेच्या सुमारास वेरूळ लेण्यासमोर महावीर कीर्ती स्तंभ आणि त्यासमोरील परिसरातील कचरा, पालापाचोळा हटवून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत जैन गुरुकुलचे विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
​पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे, तसेच जयंतीनिमित्त येणाऱ्या भाविकांना मंगलमयी वातावरण मिळावे, हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश असल्याचे संयोजक
आशिष कानडे सर यांनी सांगितले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments