महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर – महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
