Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अ‍ॅड.भास्कर मगरे यांच्या आंदोलनाला यश-अभिमन्यू खोतकर दलित...

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अ‍ॅड.भास्कर मगरे यांच्या आंदोलनाला यश-अभिमन्यू खोतकर दलित आदिवासी भूमिहीन कासकारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार- दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अ‍ॅड.भास्कर मगरे यांच्या आंदोलनाला यश-अभिमन्यू खोतकर
दलित आदिवासी भूमिहीन कासकारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार- दलित
आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

जालना/प्रतिनिधी/ महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या
सकारात्मक निर्णयामुळे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर
मगरे यांच्या भुमिहिन, कास्तकर, आदिवासी यांच्यासाठी करण्यात आलेल्या
आंदोलनाला यश आले असल्याचे युवासेनेचे अभिमन्यु खोतकर यांनी सांगितले.
शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जालना तालुकास्तरीय दलित आदिवासी भूमिहीन
कास्तकार मेळावा ११ ऑगस्ट रोजी घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मेळाव्याचे उद्घाटक युवा सेना म.रा.सचिव  अभिमन्यू खोतकर, दलित
आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे, अण्णासाहेब बाळराज, जय खरात
यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अभिमन्यू खोतकर म्हणाले की,  महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील दलित आदिवासी भूमिहीन शेतजमिनी नावे
करून सातबारा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जालना जिल्ह्यात शिवसेना
दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी गेले अनेक वर्षापासून
जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष केला आहे. त्या संघर्षाला
आज यश आलेले आहे. अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की,
शिवसेना दलित आघाडी गेली अनेक वर्षापासून जनआंदोलनाच्या माध्यमातून
रस्त्यावरचा संघर्ष करत आहे हे आंदोलन कायदेशीर मार्गाने असल्यामुळे
आतापर्यंत या आंदोलनात लाभार्थ्यांची संख्या वाढत गेली.
शासन निर्णय २८ नोव्हेंबर १९९१ अधिनियमानुसार १ एप्रिल १९७८ ते १४ एप्रिल
१९९० या दरम्यान महाराष्ट्रातील दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांचे
शेतीसाठी झालेले अतिक्रमण नियमानुकुलित करून त्यांना सातबारा देण्यात
यावा असे शासनाचे आदेश असताना प्रशासकीय स्तरावर आतापर्यंत या शासन
निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती आणि म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून जी
भूमिका मांडली त्या भूमिकेला आज रोजी यश आलेलं आहे. कारण महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जो राज्यातील दलित आदिवासी भूमिहीन
कास्तकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला आहे. जालना जिल्ह्यातील
दलित आदिवासी भूमिहीन कासकारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. शिवसेना
दलित आघाडीच्या जालना तालुकास्तरीय मेळाव्यास जालना ग्रामीण भागातून
मोठ्या संख्येने दलित आदिवासी भूमीन कास्तकारांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments