Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादमहसूल सप्ताहनिमित्त तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

महसूल सप्ताहनिमित्त तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

महसूल सप्ताहनिमित्त तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार ३० जुलै ते सहा ऑगस्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येत असुन, त्या अंतर्गत खुलताबाद तहसील कार्यालयात शुक्रवारी (ता. एक) सकाळी १० वाजता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या आरोग्य शिबिरात तहसीलदार स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार प्रमोद सावंत, सुभाष पांढरे, पुरवठा निरीक्षक राहुल खेडकर, सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी “अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा सातबाराा तयार करण्यात आला,” अशी कल्पक संकल्पना राबवण्यात आली. महसूल रेकॉर्डप्रमाणेच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आरोग्यविषयक माहितीची नोंद घेण्यात आली.

या तपासणी शिबिरात रक्तदाब, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, वजन, दंत तपासणी आदी चाचण्या करण्यात आल्या. तपासणीचा सविस्तर आरोग्य अहवाल तयार करून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. महसूल विभागात प्रथमच आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारा हा उपक्रम राबवण्यात आला असून, “स्वतः निरोगी, तरच सेवा सक्षम, “हे ब्रीद या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments