महापालिकेला गेट नाही,मनसे संतप्त-मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचा ईशारा
जालना/ प्रतिनीधी / जालना महापालिकेचा कारभार मनमानी होऊन बसला आहे सध्या या महापालिकेला गेट देखिल नाही त्यामुळे महापालिकेतून अनेक साहित्य चोरीला जात आहे या आधी अनेक महत्वाचे साहित्य महापालिकेतून चोरीला गेले आहे त्यामुळे महापालिका आयुक्त जर महापालिकेचे रक्षण करू शकत नसतील तर मग शहराचे काय रक्षण करणार असा सवाल आज दि.11 रविवार रोजी दुपारी चार वा. च्या सुमारास मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केला आहे.तुम्ही जर महापालिकेचे रक्षण करू शकत नसाल तर मनसे या तुमच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचा ईशारा देखील त्यांनी दिला आहे.याशिवाय तुम्ही काय फक्त पैसे खायला तिथे बसले आहे का असा सवाल देखील त्यांनी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना केला आहे त्यामुळे महापालिका आयुक्त आता तरी झोपेतून जागे होऊन महापालिकेला गेट बसवतील अशी अपेक्षा आहे .महापालिकेला गेट नसल्यानं मोकाट कुत्र्यांचाही महापालिका कार्यलयात वावर असून अधिकारी कुत्रे पळवून लावतील की कामे करतील हा देखील प्रश्न राहुल रत्नपारखे यांनी ऊपस्थित केला आहे.