Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादमहानगरपालिकेवर आ.खोतकर यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा - शेख. वहिद

महानगरपालिकेवर आ.खोतकर यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा – शेख. वहिद

महानगरपालिकेवर आ.खोतकर यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा – शेख. वहिद

जालना/ आगामी जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत शहराचा चौफेर विकास करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ( शिंदे गटचा ) भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कंबर कसावी असे आवाहन माजी नगरसेवक तथा धडाडीचे शिवसैनिक शेख . वहिद यांनीी केले आहे.
       विधानसभेच्या निवडणुकीत जालनेकारांनी श्री. खोतकर यांना प्रचंड मतांनी विजयी करून जो विश्वास व्यक्त केला त्यावर श्री. खोतकर हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तंतोतंत खरे उतरले आहे. अवघ्या काही महिन्यांमध्येच त्यांनी आपल्या  विकास कामांची चुणूक दाखवून दिली आहे शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न पोट तिडकीने सोडविण्याचा प्रयत्न करत असताना अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्र झपाट्याने पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहेत यामुळे जालनेकारांना पुरेशे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून शहराला महिन्यातून तीन वेळेस पाणी पुरवठा होत असल्यामुळे जालनेकर आणि विशेष करून झोपडपट्टी भागात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण  झालेला आहे आ. श्री खोतकर यांनी इतर विकास कामापेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिल्यामुळे त्यांनी जनते बद्दलची तळमळ दिसून येते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने महानगरपालिका  आ. श्री खोतकर यांच्या विकासाभिमुख आणि कर्तबगार नेत्यांच्या ताब्यात असने गरजेचे आहे  असे शेख वहिद सांगितले आहे .
         शहरातील शिवसैनिकांनी आपापल्या प्रभागामध्ये नागरिकांच्या अडी अडचणी सोडून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आतापासूनच सज्ज राहावे आणि आ. श्री खोतकर यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळेल यासाठी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे श्री शेख वहीद यांनींनी सांगितले आहे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments