Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादमहानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा कार्यालयात इच्छुक उमेदवारी अर्ज आज वितरण करणार - भाजपा जालना...

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा कार्यालयात इच्छुक उमेदवारी अर्ज आज वितरण करणार – भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा कार्यालयात इच्छुक उमेदवारी अर्ज आज वितरण करणार भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना/प्रतिनिधी/ भारतीय जनता पार्टी, जालना महानगर तर्फे आगामी जालना महानगरपालिका निवडणूक 2025-२६ करिता इच्छुक उमेदवारी अर्जांचे वितरण आज दिनांक १२ डिसेंबर 2025 रोजी सकाळी १०.00 वा. भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात माजी केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब पाटील दानवे, निवडणूक प्रभारी डॉ.भागवतजी कराड, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, जालना ग्रा.जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे, आ. संतोष पाटील दानवे, भाजपा महानगर निवडणूक प्रमुख माजी आमदार कैलासजी गोरंटयाल व भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, राजेश राऊत, अशोक आण्णा पांगारकर, विजय कामड, विमलताई आगलावे, सतीश जाधव, संध्याताई देठे, शुभांगीताई देशपांडे यांच्यासह जालना महानगरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी इच्छुक उमेदवारांनी आपले इच्छुक उमेदवारी अर्ज दिनांक १२/12/2025 ते १३/१२/२०२५ सकाळी १०.०० ते सायं 5.00 वाजेपर्यंत उपलब्ध राहतील, तसेच दिनांक १४/१२/२०२५ रोजी पासून इच्छुकांचे भरलेले इच्छुक उमेदवारी अर्ज सकाळी १०.०० ते सायं ५.०० पर्यंत स्वीकारून मुलाखती घेतल्या जातील तरी इच्छुकांनी भाजपा जिल्हा कार्यालय, राजुरी कॉर्नर, संभाजीनगर, जालना येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी 5.०० वाजेपर्यंत जमा करावेत असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments