Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादछत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर/ छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्याचा व्यापक प्रसार, ओळख व दृष्टीकोन प्रतिबिंबित करणारे नवीन बोधचिन्ह (Logo) व बोधवाक्य (Tagline) तयार करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्राद्वारे कळविण्यात आले आहे. स्पर्धेसाठी 08 ऑगस्ट 2025 ही अंतीम मुदत आहे.

खुल्या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी कल्पक, अर्थपूर्ण व सौंदर्यपूर्ण बोधचिन्ह तयार करणे, प्राधिकरणाच्या कार्यपध्दती, दृष्टीकोन व शहराच्या विकासाची दिशा अधोरेखीत करणारे बोधवाक्य सूचविणे इत्यादी विषय राहणार आहेत. या स्पर्धेमध्ये सर्व नागरीक, व्यवसायीक डिझायनर, विद्यार्थी, कलाकार, सर्वसामान्य नागरीक, ग्राफीक्स डिझायनर, वास्तु विशारद, अभियांत्रीकी तज्ञ यांना सहभागी होता येणार आहे.

*स्पर्धेसाठी मार्गदर्शक सूचना*

बोध चिन्हाची रचना करताना या प्रदेशाची औद्योगिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मानव निर्मित

वारस्याची ओळख लक्षात घ्यायला हवी. प्राधिकरणाचे उद्दिष्ट प्रदेशात संतुलित विकास निर्माण करणे हे आहे. त्यामुळे प्राधिकरणाने भविष्यातील हाती घेण्यात येणाऱ्या विकास कामे निसर्गाचे संवर्धन साधून करावयाचे असल्याने याचे प्रतीक बोध चिन्हाच्या रचनामध्ये दाखविण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

प्राधिकरणाच्या उद्दिष्टांचा संदेश देण्यासाठी सदर बोध चिन्हामध्ये या बाबींचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे. नागरिकांकडून प्राधिकरणाच्या बोध चिन्हासहित बोध वाक्य देणे देखील अपेक्षित आहे. बोधचिन्ह नाविन्यपुर्ण असणे आवश्यक आहे.प्राधिकरणासाठी एक सर्जनशील आणि अर्थपूर्ण बोध चिन्ह तयार करण्यासाठी नागरिकांनी सर्व संभाव्य आकार, प्रमाण, रूपे किंवा प्रदेशासाठी अतिशय अद्वितीय असलेले कोणतेही चिन्ह किंवा रंग वापरण्याचे स्वातंत्र्य असेल.

बोध चिन्ह कसा असायला हवा याकरिता नागरिक महाराष्ट्रातील इतर प्राधिकरणे जसे की मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे इ. यांचे बोधचिन्हे पाहू शकता. अधिक माहितीकरिता प्राधिकरणाच्या अधिकृत (www.csmrda.in) या संकेत स्थळाला भेट देता येईल.

स्पर्धकांनी आपली वैयक्तीक माहिती, तयार केलेले बोधचिन्ह आणि बोधवाक्य प्राधिकरणाच्या website वर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या google form मध्ये भरणे बंधनकारक आहे. तसेच सदर वैयक्तीक माहिती व तयार केलेले बोधचिन्ह व बोधवाक्य logocsmrda@gmail.com या ईमेलवर सादर करावे व प्रत समक्ष अथवा स्पीड पोस्टव्दारे प्राधिकरणाच्या कार्यालयास विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक असणार आहे.

नागरिकांनी एआयचा वापर करुन तयार केलेले बोध चिन्ह कोणतेही प्रकारचे Copy rights/Trademark/Registered यांचे उलंघन करित नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. याबाबत कोणतेही कायदेशीर बाब उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यक्तीची असणार आहे.

 बोध चिन्ह तयार करतेवेळी Google Printerest shtterstock इत्यादी संकतेस्थळावरुन डाऊनलोडेड नसावी तसेच  स्पर्धकाने सदर प्रतियोगितेमध्ये सादर केलेले बोधचिन्ह आणि बोधवाक्य हे प्राधिकरणाच्या मालकीचे असेल त्यावर स्पर्धकास कोणताही मालकी हक्क सांगता येणार नाही व त्याबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही, याची नोंद घ्यावी,

सदर स्पर्धा कोणतेही टप्प्यावर रद्द करण्याचे सर्वस्वी अधिकार महानगर आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना असतील, याबाबत कोणत्याही प्रकारचे निर्णय अंतिम करण्याबाबतचे सर्व अधिकार महानगर आयुक्त यांना असणार आहेत.  सदर निर्णयाबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.

*स्पर्धेसाठी पारितोषिक*

 प्रथम पारितोषीकः रुपये 20 हजार, व्दितीय पारितोषीकः रुपये 15 हजार,  तिसरे पारितोषीक रुपये 10 हजार, उत्तेजनार्थ पारीतोषीक (2): रुपये 5 हजार प्रत्येकी असे स्वरूप आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments