महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बोरगांव येथे उत्साहात संपन्न !
जालना : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगांव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके हे होते तर प्रमुख पाहुणे सेवली सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख यांच्या कार्याची दखल घेत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच नासिकेत खैरे, मुख्याध्यापक श्री चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण डोके, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बाबासाहेब डोके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दिलीप मगर, गौतम मगर, ईश्वर डोके, अरुण डोके,मदन डोके, संजय डोके, दिपक दत्ता डोके,भाऊसाहेब डोके, दत्ता काळे, अविनाश डोके, सम्यक डोके यांच्या सह महीला व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.