माजलगांव शहर पुलिस स्टेशनची परत एक दबंग कामगिरी
तिर्रट नावाच्या जुगारांवर माजलगांव शहर पोलीसांचा छापा
माजलगांव/ प्रतिनिधी/ शेख हमीद / माजलगांव शहर येथील आज दिनांक २३/०३/२०२५ रोजी गोपनिय माहीतीच्या आधारे माजलगांव शहर पोलीसांनी माजलगांव शहरातील अरुफात मोहल्ला, मंजरथ रोड, माजलगाव परीसरातील काही लोक तिर्रट नावाच्या जुगार खेळत असल्याची माहीती माजलगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांना मिळाले वरुन पोलीसांनी १८.०० वाजता छापा मारुन तेथे तिर्रट नावाच्या जुगार खेळ णारे इसम नामे १) सुनिल बाबुराव गायकवाड २) सलमान नजीर शेख यांना ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन नगदी रुपये, मोबाईल व जुगाराचे साहीत्य असा एकुण २३०४०/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द पोस्टे माजलगाव शहर गु.र.नं.१२१/२०२५ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई नवनित कॉवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, नीरज राजगुरु पोलीस उपअधीक्षक उपविभाग गेवराई, अति. पदभार माजलगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप राठोड, पोअ. अमोल कदम, पोअ. शिवगणेश मिरकले, पोअ. सुनिल गवळी, यांनी केलीआहे.