महाराष्ट्र पुरुष संघास रौप्य तर महिला संघास कांस्य
भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत गाझियाबाद सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15व्या वरीष्ठ पुरूष/महिला राष्ट्रीय सॉफ्टबॉल फेडरेशन कप स्पर्धा दि.12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान,एच.एल. एम ग्रुप इन्स्टिट्यूट गाझियाबाद(युपी) येथे संपन्न झाल्या असून या स्पर्धेत पंजाब पुरुष संघाने सुवर्ण पदक,
महाराष्ट्र संघाने रौप्य तर मध्यप्रदेश संघाने कांस्य पदक प्राप्त केले तर महिलांच्या गटात मध्यप्रदेश सुवर्ण, पंजाब रौप्य तर महाराष्ट्र संघाने कांस्य पदक प्राप्त केले.
बक्षीस समारंभ फारुक आलम (आय.पी.एस अधिकारी) अनुज अग्रवाल (डायरेक्टर) धीरज शर्मा भारतीय सॉफ्टबॉल असो.चे माजी सेक्रेटरी एल.आर मौर्य,डॉ.प्रवीण अनावकर (सचिव),सॉफ्टबॉल इंडिया टेक्निकल कमिटी चे चेअरमन व आंतरराष्ट्रीय पंच सॉफ्टबॉल व बेसबॉल 5 चे मुकुल देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने महाराष्ट्र संघास (3-0) होमरन च्या फरकाने पराभूत केले.
पुरुषांच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात ऋत्विक कुडवे ह्यांनी भेदक पिचिंग केली व कल्पेश कोल्हे ह्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तसेच व्यंकटेश झिपरे,सौरभ टोकसे,अभिषेक सेलोकर, यांनी पूर्ण स्पर्धेत उत्कृष हिटिंग करून सर्वांचे लक्ष वेधले. महिला खेळाडूं मध्ये महाराष्ट्र संघकडून करिष्मा कुडचे, प्रीती कांबळे,सई जोशी, राक्षा शिंदे यांनी उत्र्कुष्ट हिटिंग बरोबर अंजली पवार ने पीचींग करत संघाना विजय प्राप्त करून देण्यास महत्त्वाचे योगदान दिले.
या विजयी संघास प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, आंतरराष्ट्रिय खेळाडू प्रशिक्षक प्रा.जयंत जाधव,दीपक खंदारे तर व्यवस्थापक म्हणून भीमा मोरे,चेतन चौधरी ह्यांचे मार्गदर्शन लाभले.
अंतिम सामन्यात शेषराज खेडकर,सुरेश रैना,विजेश कुमार,पवन कुमार, सुयोग कल्पेकर,एम.बद्रीनारायण,
शफनास एन,यांनी पंचाची भूमिका निभावली.
या विजयाबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष गिरीश महाजन,सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर,सहसचिव प्रशांत जगताप,गोकुळ तांदळे, देविदास पाटील,सुरजसिंग येवतीकर,रमाकांत बनसोडे, विकास टोणे,नितीन पाटील दीपक रुईकर,गणेश बेटूदे आदींनी शुभेच्छा दिल्या.