Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादमा.केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे  यांचा ड्रीम प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात 

मा.केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे  यांचा ड्रीम प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात 

मा.केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे  यांचा ड्रीम प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात 
जालना…मराठवाडा आणि लगतच्या विदर्भातील उद्योग, व्यापार व शेतकऱ्यांना देशांतर्गत तसेच परदेशांत मालाची सहजपणे अतिशय स्वस्त दरांत वाहतूक व्यवस्था असलेल्या ड्रायपोर्ट मल्टीमोड लाॅजिस्टीक पार्क चे प्रत्यक्ष कामकाजाची माहिती आणि ड्रायपोर्ट परिसराला  जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी व शेतकऱ्यांनी बुधवारी दि.२३ रोजी भेट देऊन पाहणी केली.
    रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या सभागृहात आयोजित बैठकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्कर पाटील दानवे यांनी मराठवाड्यातील सर्व उद्योजक, व्यापारी आणि शेतकरी ड्रायपोर्टचे प्रत्यक्ष कामकाज लवकरात लवकर सुरू होण्याची प्रतिक्षेत आहेत असे सांगून तो सुवर्ण क्षण उगवला आहे असे म्हटले हा प्रकल्प संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलण्याची क्षमता असलेला आहे असे दानवेंनी सांगितले माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या ड्रायपोर्टच्या उभारण्यात खूप प्रचंड मेहनत घेतली असून खर्या अर्थाने आता विकासाला गती मिळाली आहे असे ते म्हणाले.
   यावेळी जेष्ठ उद्योजक सुनील रायठठ्ठा, पोलाद स्टील चे संचालक नितीन काबरा, महीको चे संचालक रितेश मिश्रा, आयकॉन स्टील चे संचालक उषमेश राठी व अखिलेश राठी, कालिका स्टील चे संचालक गोविंद गोयल व गोपाल गोयल, लघुउद्योग भारती संघटनेचे अविनाश देशपांडे, नितीन बागडी, भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष सतीश जाधव, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघठन मंत्री सिध्दीविनायक मुळे  जिल्हा उपाध्यक्ष श्री.धनराज काबलीये मंडळ अध्यक्ष श्री.महेश निकम श्री.निवृत्ती लंके उपस्थित होते.
बैठकीचे सुत्रसंचलन अर्जुन गेही यांनी केले यावेळी राष्ट्रीय महामार्ग कार्पोरेशनचे उपाध्यक्ष राजकुमारसिंग चव्हाण, सहायक उपाध्यक्ष सुर्जितो  मोहंतो आणि जालना ड्रायपोर्टचे टर्मिनल मॅनेजर विकास मलिक यांनी ड्रायपोर्ट संचलनासंदर्भात सविस्तर माहिती दिली उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे‌ दिली.
-गोवर्धन कोल्हे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments