मा. सभापती अशोक डक यांचा वाढदिवस विवीध उपक्रमांनी साजरा
माजलगाव/प्रतिनिधी/मुंबई बाजार समितीचे मा. सभापती अशोक डक यांचा वाढदिवस विवीध उपक्रमांनी तालुकाभरात आज दि. १२ जुन २०२५ रोजी अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मा. सभापती अशोक डक यांच्या वाढदिवसानिमीत्त सकाळी ९.००वाजता शासकीय रूग्णालयात फळ वाटप, १०.०० वाजता देवखेडा येथील गोशाळेत गाईंना चारावाटप, ११.०० वाजता शहरातील भिमनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप, तालुक्यातील सांडस चिंचोली येथे क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले तर दु. १.०० वाजता पालावर राहणा-या गरजु, गरिब महिलांना साडी व अन्नदानाचे वाटप करण्यात आले तर दि. १२ जुन २०२५ रोजी जन्म घेणा-या मुली करीता पाच हजार रूपयांची एफडी त्यांचे नावे बॅंकेत करून देण्यात येणार आहे. अशा विवीध समाजोपयोगी कार्यक्रमांनी मा. सभापती अशोक डक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बंडू गायकवाड, दिलीप सोळंके, गणेश धुमाळ, मनोज आगे, शशीकांत गायकवाड, बालू घाडगे, राजेश राठोड, रत्नपाल टाकणखार, अजित गायकवाड,अजिंक्य गायकवाड आकाश मायकर यांचेसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.