लासूर स्टेशन येथे १६ ते २२ एप्रिल दरम्यान होणाऱ्या शिवमहापुराण कथेचे पंडित प्रदीप मिश्रा यांना आयोजकांकडून निमंत्रण.
आयोजकांसह श्री घृष्णेश्वर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती
दैनिक आत्ताच एक्सप्रेस गंगापूर प्रतिनिधी फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे संत जगनाडे महाराज मंदिर परिसरात दि १६ ते २२ एप्रिल दरम्यान होणाऱ्या भव्य दिव्य शिवमहापुराण कथेचे निमंत्रण पंडित प्रदीप मिश्रा यांना देण्यात आले. दरम्यान लासूर स्टेशन येथील माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांनी आ प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित राघवजी मिश्रा यांच्या महाकथेचे आयोजन करण्यात आले आहे दि, २८ मार्चं रोजी आयोजकांनी थेट श्री क्षेत्र सिहोर (मध्यप्रदेश) येथे जाऊन आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांना लासूर स्टेशन येथे पंडित राघवजी मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून १६ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान शिवमहापुराण कथा होणार असून यां कथेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पंडित प्रदीपजी मिश्रा यांना देऊन कथेत आपणही उपस्थिती दर्शवावी यासाठी त्यांना आमंत्रित केले आहे यावेळी आयोजक गणेश अंबादास व्यवहारे यांच्यासह घृष्णेश्वर प्रतिष्ठानचे वाल्मीक बोरसे,विशाल मुंदडा, शिवाजी चव्हाण, मारुती गिधाने, संतोष बिरुटे,उत्कर्ष वंजारे,अनिल मोरे, रामकिसन हाडके आदींची उपस्थिती होती.