लोणी विविध कार्यकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी बाबुराव दांडेकर यांची निवड
खुलताबाद / प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील लोणी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या उपाध्यपदी बाबुराव दांडेकर यांची गुरुवारी (दि.२९) बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी.सोसायटी च्या अध्यक्ष यास्मीन कदीर पटेल, छ. संभाजीनगर महानगर पालिकेचे माजी महापौर सुदाम मामा सोनवणे.कृ.उ.बा. समिती चे संचालक बाळकृष्ण दांडेकर, लोणी ग्रुप ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य मोहिन सांडू पटेल,माजी उपसरपंच नानासाहेब दांडेकर, दामोधर दांडेकर, हरिभाऊ दांडेकर,वसंत दांडेकर,सोसायटी सदस्य महेमुद पटेल, अंबादास जाधव, प्रल्हाद दांडेकर,गणेश दांडेकर,कलीम पटेल, अशोक दांडेकर, गिंताजली सुदाम मामा सोनवणे, कमलबाई धोंडकर,सेवानिवृत्त शिक्षक मुजीब पटेल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सहकार अधिकारी प्रविण खंडाळे, तालुका गटसचिव योगेश दांडेकर यांनी निवडणुक पार पाडली
