लासुर स्टेशन येथे महाशिवपुराण कथेला तिस हजार भाविकांनी लावली हजेरी शिवभक्तांनो ध्यान लगाया कलयुग में शिवयुग आया पंडित राघव मिश्रा
सामाजिक,आरोग्य, धार्मिक, शैक्षणिक, विविध कार्यात लासूर स्टेशन येथील व्यवहारे कुटुंबाचे मोठे योगदान … आ, प्रशांत बंब…
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी / गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे शिवमहापुराण कथा मोठ्या उत्साहात सुरु असून आज या कथेला आ प्रशांत बंब यांनी भेट दिली.भाविकांच्या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला.भाविकांना निवास,पिण्याचे पाणी,भोजन व्यवस्था, शौचालय व्यवस्था,सभामंडपात कुलरची व्यवस्था केल्याने बंब यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी बंब यांनी सांगितले कि,सामाजिक क्षेत्रात गणेश व्यवहारे यांचे चांगले कार्य असून आईच्या इच्छेसाठी त्यांनी शिवमहापुराण कथेचे आयोजन केले.हि अत्यंत कौतुस्कापद बाब आहे.
आज कथेची सुरुवात कथावाचक राघव मिश्रा यांच्याहस्ते माती पूजनाने करण्यात आली. दुध,दही, घी, गोमूत्र व गोबर या पंचतत्वाने मातीची पूजा करण्यात आली.शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीची सुपीकता कमी झाली आहे.त्यामुळे आपण दूषित अन्न खात आहोत.तरी आपण थोडी तरी जमीन घेऊन त्यामध्ये आपण पंचतत्वाचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवावी व त्यामध्ये स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य व भाजीपाला पिकवावा.धरणी व गोमातेची सेवा करावी.गायीमध्ये तेतीस कोटी देवदेवतांचे अस्तित्व असते. आपण भगवंताशी एक नातं निर्माण केलं पाहिजे म्हणजे भगवंत आपला वाटेल आणि सहज प्राप्त होईल. माणसाने फक्त पैशाच्या मागे धावू नये कारण मृत्युनंतर आपण पैसे सोबत नेऊ शकत नाही पण आपले कर्म आपल्यासोबत असते.कर्माचे भोग कोणालाही चुकत नाही.यावेळी त्यांनी भक्तांना दानाचे महत्व सांगितले.दान कधीही गुप्तपणे केले पाहिजे. दान हे एका हाताचे दुसऱ्या हाताला कळू नये. “शिवभक्तोनो ध्यान लगाया,कलयुग में शिवयुग आया” या भजनावर भक्तांनी ठेका धरला. कथेची सांगता आ, प्रशांत बंब यांच्याहस्ते महादेवाच्या आरतीने झाली. सुमारे तीस हजार भक्तांची उपस्थिती कथेला होती