Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादलासुर स्टेशन येथे पंडित राघव मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला सुरुवात २२ एप्रिलला...

लासुर स्टेशन येथे पंडित राघव मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला सुरुवात २२ एप्रिलला होणार सांगता

लासुर स्टेशन येथे पंडित राघव मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला सुरुवात २२ एप्रिलला होणार सांगता
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी /फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गणेश अंबादास व्यवहारे यांनी लासूर स्टेशन येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे.आज बुधवार रोजी या कथेचा प्रारंभ झाला. सकाळी गणपती मंदिर येथून कलश यात्रा काढण्यात आली.यावेळी कथावाचक राघव मिश्रा यांची रथातून भव्य मिरवणूक डीजे व फटाक्यांच्या आतिशबाजीत कथास्थळापर्यंत काढण्यात आली.यावेळी शेकडो महिलांनी डोक्यावर कलश घेऊन महादेवाच्या जयघोषात सहभाग नोंदवला. दरम्यान
दुपारी कथास्थळी आयोजक गणेश व्यवहारे,उद्योजक प्रितमकुमार मुथा, संदेश बंब,संजय पांडव,दिनेश व्यवहारे यांनी सपत्नीक कथावाचक राघव मिश्रा यांचे संतपूजन केले.मिश्रा यांनी आपल्या रसाळ अमृतवाणीतून शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले.यावेळी ते म्हणाले कि,देवी दाक्षायनी मातेच्या मंदिराजवळ असलेल्या लासूरनगरीत कथा करण्याचा आनंद होतं आहे. कधीही कुणाची निंदा करू नका.एखाद्याची चूक त्याच्या तोंडावर सांगून त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे.त्या व्यक्तीच्या चुका इतरांना सांगून टिंगलटवाळी करू नये.सत्य आपण स्वीकारले पाहिजे.नियमित महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवआराधना करावी व सत्कर्म करावे.
यावेळी हजारो शिवभक्तांची उपस्थिती होती.ओम नमः शिवाय या जपाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.पहिल्या दिवसाच्या कथेची सांगता आमदार प्रशांत बंब यांचे आईवडील डॉ.बन्सीलाल बंब व कांचन बंब यांच्याहस्ते महादेवाच्या आरतीने झाली.यावेळी आयोजक गणेश व्यवहारे यांनी शिवभक्तांनी दररोज कथेला दुपारी दोन ते पाच यावेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments