Sunday, March 29, 2026
Homeऔरंगाबादलासुर स्टेशन येथे पूजा ऑटो पार्टस गॅरेजला शॉर्टसर्किटमुळे आग लागली लाखो रुपयेचे...

लासुर स्टेशन येथे पूजा ऑटो पार्टस गॅरेजला शॉर्टसर्किटमुळे आग लागली लाखो रुपयेचे झाले नुकसान

लासुर स्टेशन येथे पूजा ऑटो पार्टस गॅरेजला शॉर्टसर्किटमुळे आग लागली लाखो रुपयेचे झाले नुकसान
आत्ताच एक्सप्रेस
गंगापुर/प्रतिनिधी/  गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील संतोष काळे यांचे असलेले मालकीचे पुजा ऑटो पार्टस गॅरेजला दि २५ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून अंदाजे २३ लाख ५० हजार  रुपयांचे साहित्य जळून खाक झाले ही आग एवढी भयंकर होती दुकानातील सर्व स्पेअर पार्ट टायर इलेक्ट्रिक स्पार्ट संपूर्ण इतर सामानाची राख रांगोळी झाली या घटनेत सर्व छोटे मोठे साहित्य जळून खाक झाले ह्या आगीने रुद्र रूप धारण केले होते बघता बघता आगीचे लोळ उठायला लागले मात्र देव बलबत्त्यावर होते म्हणून आजूबाजूच्या दुकानाला या आगीमुळे नुकसान झाले नाहीत  परिसरातील नागरिक  मदतीसाठी धावले सर्वांनी मिळेल त्या इकडून तिकडून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आटोक्यात आणायला दरम्यान एक ते दीड तास लागला तो पर्यंत दुकानातील सर्व सामानाचे नुकसान झाले होते त्यावेळी लासुर स्टेशन येथील ग्रामस्थांनी आणि विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी आगीतून महादेवाची मूर्ती बाहेर काढलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आग लागलेल्या घटनास्थळी  ग्रामस्थांनी मदतकार्य केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments