लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीतुन कांदा निघाला दुबईला …
कांद्याला दुबईत मागणी बाजार समितीतून कंटनेरने कांदा दुबईला रवाना…
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील मराठवाड्यातील क्रमांक दोनची कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या लासुर स्टेशन येथील दुर्वालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीच्या शुभम चंद्रकांत पवार या व्यापाऱ्याने खरेदी केलेला शेतकऱ्यांचा कांदा आता थेट दुबईला एक्सपोर्ट झाला असून काल शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव,उपसभापती अनिल पाटील चव्हाण,चंद्रकांत पवार यांच्या शुभहस्ते कंटेनरचे पूजन करून कंटेनर रवाना करण्यात आले. दरम्यान यावेळी बाजार समितीचे संचालक सर्वश्री.मनिष पाटील पोळ, प्रकाश मुथा,सुनील पाखरे,अशोक पाटील जगताप,भाऊसाहेब पाटील चिंधे,सुबोध मुथा,सचिव एस.एस.पवार,इंजिनिअर उदावंत व्यापारी,शेतकरी,हमाल मापाडी आदिची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.