Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादलासुर स्टेशन येथे काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यासोबत आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न...

लासुर स्टेशन येथे काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यासोबत आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न…

लासुर स्टेशन येथे काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यासोबत आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न…
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे काँग्रेस पार्टीने कार्यकर्तेच्या उपस्थित आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली  दरम्यान काही दिवसांपूर्वी नगरपरिषदच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये काँग्रेस पार्टीने जिल्ह्यामध्ये  कन्नड आणि खुलताबाद या दोन ठिकाणी नगराध्यक्षपदाची मुसंडी मारल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्सवाचे वातावरण आहे   दरम्यान नगरपालिका निवडणुका नंतर काँग्रेस पक्षाने गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली असून याचाच एक भाग म्हणून लासुर स्टेशन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक दि ,२८ डिसेंबर रोजी घेण्यात आली होती  जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड यांनी मार्गदर्शन केलं
    लासुर स्टेशन जिल्हा परिषद गट आणि गणातून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लढणार असून कार्यकर्त्यांनी तयारी करावी पक्ष आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील असं प्रतिपादन किरण पाटील डोणगावकर यांनी केलं.
लासुर स्टेशन जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.लासुर स्टेशन शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी याप्रसंगी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किशोर पवार सर यांनी त्यांच स्वागत केलं.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष किशोर पवारसर,सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघचौरे तर आभार तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड यांनी मानले.
 याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर तालुकाध्यक्ष सूर्यकांत पाटील गरड, खुलताबाद बाजार समितीचे माजी सभापती,अनिल,पाटील,श्रीखंडे,मोहनराव खंडागळे, गुलाबराव शेजुळ, दिवशी पिंपळगाव चे माजी सरपंच संतोष आबा जाधव, चेतन काळे, कडू भाऊ शेलार, बाळू दुसिंग, रिचर्ड बत्तीशे, बाबासाहेब सोनवणे, समाजसेवक अशोक कीर्तीकर, भास्कर बनसोडे सर, मच्छिंद्र पानकर सर, सिद्धार्थ गायकवाड, पेंटर दिवे, किरण पानकर, संदीप शेजुळ, बापू देशमुख, सुनील पाटील डोणगावकर, जाधव सर दायगावकर, प्रसाद देवकर, सोपान सोमासे, रवी सोमासे,नागसेन बागुल डॉ.अभिजीत पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments