लासुर स्टेशन येथील अनेक दिवसांपासून असलेला पाणी टंचाईचा प्रश्न मिटणार जलकुंभ व मुख्य वितरण जलकुंडाचे भूमिपूजन.आ, बंब, हस्ते…
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन जल जीवन मिशन अंतर्गत गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावागावात अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईन व जल कुंभाचे काम सुरू केले आहे. पुढील एका वर्षात मतदारसंघातील गावांना पिण्याचे पाणी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आ, प्रशांत बंब यांनी केले.
लासुर स्टेशन येथे दि.५, डिसेंबर रोजी दोन जल जलजीवन मिशन योजनेंतर्गत जलकुंभाचे भूमिपूजन आ प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलजीवन मिशनचे उपअभियंता बी. बी. सदावर्ते, शाखा अभियंता समीर यन्नावार, डी.एस. कासले, कृऊबा समितीचे सभापती शेषराव जाधव, सरपंच मीना संजय पांडव, प्रतिष्ठित व्यापारी सुरेश मुनोत यांची उपस्थिती होती. दरम्यान लासुर स्टेशन येथे ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा सुरळीत पार करण्यासाठी सावंगी आनंतपुर व सावंगी हर्सूल यासाठी अनुक्रमे तीन लाख ५५ हजार व दोन लाख ६९ हजार क्षमतेच्या दोन पाणी टाक्या (जलकुंभ) च्या कामाचे बाजारा तळ या ठिकाणी भूमिपूजन करण्यात येऊन याच ठिकाणी एक लाख ५० हजार लिटर क्षमतेचे मुख्य वितरण कुंडाचे देखील काम होत असल्याची माहिती आ बंब यांनी यावेळी दिली.यावेळी महेंद्र पांडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोकरे, नारायण वाकळे, कल्याण पवार, अशोक सौदागर, राजू गायकवाड, रंजना बोरकर, सपना बनकर, संदीप आमराव, राजू पठाण, संजय पांडव रि पा ई चे तान्हाजी बनसोडे छोटू पठाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.