Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादलासुर स्टेशन येथे बांधकाम कामगारांना दोन हजार संसार उपयोगी,साहित्य,वाटप..आ, प्रशांत बंब यांच्या...

लासुर स्टेशन येथे बांधकाम कामगारांना दोन हजार संसार उपयोगी,साहित्य,वाटप..आ, प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थिती 

लासुर स्टेशन येथे बांधकाम कामगारांना दोन हजार संसार उपयोगी,साहित्य,वाटप..आ, प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थिती 
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी लासुर स्टेशन येथील (e -kyc गृह उपयोगी साहित्य नोंदणी)  कॅम्प आयोजित करण्यात आला होता  यात तालुक्यातील तब्बल दोन हजार  बांधकाम कामगारांना बांधकाम उपयोगी संचाचे संच वाटप करण्यात आले.
 गृह उपयोगी संच मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या दहा हजार बांधकाम कामगारांना व नवीन नोंदणी केलेल्या शेवटच्या लाभार्थ्यांना संच देण्यात येणार असल्याचे माहितीही आ प्रशांत बंब यांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान दि.१४ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर पर्यंत नवीन आणि जुन्या नोंदणीकृत अशा दोन हजार इमारत बांधकाम कामगारांची आ बंब यांच्या मार्गदर्शनाखाली गृह उपयोगी संचासाठी नोंदणी करण्यात येऊन ज्या बांधकाम कामगारांना आजपर्यंत संसार उपयोगी साहित्य नाही मिळाले अशा लाभधारकांची या पंधरवड्यात नोंदणी करून गृह उपयोगी संच वाटप करण्यात आले आहे.
यापुढेही नवीन नोंदणीकृत सर्वच चलन पावती ऍक्टिव्ह असलेल्या लाभधारकांची गृह उपयोगी साहित्यासाठी नोंदणी करून त्याच दिवशी हा गृह उपयोगी साहित्य संच वाटप करण्यात येत सल्याने लाभदारकांच्या चेहेऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसत आहे. आगामी काळात नवीन आणि जुन्या बांधकाम कामगारांना आत्तापर्यंत संसार उपयोगी साहित्य संच नाही मिळाला अशा नोंदणीकृत कामगारांना टप्याटप्याने नोंदणी करून संच देण्यात येणार असल्याचे आ बंब यांनी सांगितले. दरम्यान यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव, सरपंच मीना संजय पांडव, कृउबा समिती सदस्य ,मनीष पोळ, ग्राम पंचायत सदस्य शिला गाढे, अशोक सौदागर, कल्याण पवार, सुरेखा गायकवाड, सपना गायकवाड, यांची उपस्थिती होती तर यशस्वीतेसाठी भगवान गाढे, अजय भिसे, संदीप गायकवाड, शुभम मढीकर, आनंद कांबळे, रवी इंगळे, गणेश मांजरे, संतोष काटेखाये आदींनी मेहनत घेतली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments