लासुर स्टेशन शिक्षक कॉलनी येथे महिला दांडिया खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जागीच मृत्यू
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे काल शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली असून दांडिया खेळताना एका महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला,दरम्यान महिला ही पाडळसा येथील रहिवासी असून व सध्या लासुर स्टेशन येथील बस स्टॅन्ड परिसरात राहत होत्या नंदिनी अंबादास पवार वय वर्षे ३५ ह्या काल शुक्रवारी रात्री नवरात्री उत्सवात दांडिया खेळत असताना त्यांना अचानक चक्कर आली व त्या जमिनीवर कोसळल्या उपस्थित भावीकांनी त्यांना त्वरित खाजगी दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले नंदिनी ह्या खूप मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यामुळे त्यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नंदिनी ह्या आरापूर येथील धनंजय ऑटो कंपनीमध्ये नोकरी करत होत्या त्यांना दोन मुले असून आज शनिवारी शवविच्छेदन अहवालानंतर पाडळसां येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.