लासूर स्टेशन रेल्वेगेट येथे उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे भुमिपुजन, आ. बंब यांच्या हंस्ते करण्यात आले…
अखेर… वंचित बहुजन आघाडीच्या अनिल चंडालिया यांच्या आंदोलनाला यश… उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा…
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील रेल्वे गेट क्रमांक ३४,लगत भूमिपूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान रेल्वे गेट रुळावर उड्डाणपूल व भुयारी मार्ग होणार असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आ.प्रशांत बंब यांच्या शुभहस्ते उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बंब यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला त्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावरील उड्डाणपुलाचे व भुयारी मार्गाचे भूमिपूजन केले यावेळी बोलताना आ. बंब म्हणाले की वाहनधारक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या लासुर रेल्वे गेटच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे लासुर स्टेशनचा विकास व्हायचा असेल तर रेल्वे रुळावरील कायमची होणारी वाहतूक कोंडी सुटायला हवी त्यासाठी शासन दरबारीं अथक प्रयत्नला यश आले असून येत्या काही दिवसात काम पूर्ण होईल वाहतूक कोंडी सुटेल असे आ. प्रशांत बंब यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आ.प्रशांत बंब यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता कातकडे, जागतिक बँक प्रकल्पाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता एम एम आजमी. रेल्वे विभागाचे ए डी एन बालमुच, महारेलचे राकेश शर्मा, सभापती शेषराव नाना जाधव,सरपंच मीनाताई संजय पांडव,उपसरपंच संपत छाजेड,माजी सरपंच प्रदीप भुजबळ,रमेश जाधव,रवींद्र चव्हाण,सुरेश जाधव, मोनिका सौदागर, कल्याण पवार, राजाभाऊ गायकवाड,अनिल पाटील पोळ,संदीप गायकवाड, , नितीन कांजूने, अमोल सिरसाठ,नारायण ठोळे,फिलिप गुडेकर, यांच्यासह व्यापारी किशोर राजपूत कारभारी नागे पंकज कुमार पांडे सचिन मिसाळ अभय राजपूत संतोष परदेशी दिपक परदेशी कैलास जाधव डॉ मुंदडासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती