लासूर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव पहिला दिवशी मान्यवरांनी केले विद्यार्थ्याचे स्वागत पाठ्यपुस्तकाचे केले वितरण
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळा येथे दि,१६ जून रोजी शाळा प्रवेत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला. दरम्यान याप्रसंगी प्रथमत सर्व शिक्षक समवेत इयत्ता पाचवी चे नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांची प्रवेश शाळेच्या मैदानात दिंडी काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देताना विकासाची नांदी सारी, झेडपी शाळा सर्वात भारी., उठ पालक जागा हो, झेडपी शाळेचा धागा हो. चला इतिहास घडवू या, झेडपी शाळेत च प्रवेश घेऊ या. धरूया शिक्षणाची कास, करूया विद्यार्थ्यांचा विकास. संकल्प आपल्या सर्वांचा, मुलां मुलींना शिक्षण देण्याचा. अशा घोषणा देण्यात आल्या. तदनंतर शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प – गुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात – आले. तसेच विद्यार्थी यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण वाटप करण्यात आले. तसेच आजच्या – दिवशी विद्यार्थी यांना शालेय पोषण आहार – गोड पदार्थ दिल्यामुळे मुलामुलींचे चहरे हसत मुख दिसून येते होते. यावेळी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विविध मनोरंजनात्मक खेळ, गाणी, गोष्टी, बडबडगीते, इंग्रजी राईमस, रंजक कथा, असे – विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फिरोज मन्सुरी उपाध्यक्ष सदस्य शिक्षणतज्ञ साळुंखे सर मुख्याध्यापक प्रशांत देसाई शिक्षक अरविंद तुपे बाळासाहेब भालेराव सर शुभम परोडकर शिक्षिका निर्मळा बोराडे मनिषा पाटील ममता गुंजाळ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.