लासूर स्टेशन येथे श्रीकृष्ण मंदिरांचा कलशरोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील श्री कृष्ण मंदिराचा कलशरोहण मोठ्या दिमाखात भाविकांच्या उपस्थिती मोठ्या संख्येने सोहळा पार पडला. दरम्यान या प्रसंगी श्री कृष्ण मित्र मंडळातील सर्वच जुने नवीन सदस्य एकत्र येऊन परिश्रम घेत सोहळा यशस्वी रित्या पार पाडला.कलरोशन पूजन धार्मिक विधीमधे राजकीय पुढाऱ्यांना यजमान पद न देत श्री कृष्णा मित्र मंडळाचे संस्थापक दिवंगत कै.शिवाजी पांडुरंग जाधव ज्यांची श्री कृष्णा मंदाराच्या पायाभरणी ते निर्मिर्ती मधे मोठे मोलाचे योगदान होते.त्यांच्या चिरंजीव शिवांश शिवाजी जाधव यांला कलशपूजनात यजमान पद देत नवीन आदर्श निर्माण करून दिला. यावेळी श्री कृष्ण भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.