लामणगाव जिप शाळेत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील लामणगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 2024-25 शैक्षणिक वर्षातील सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपये, इयत्ता 5 ते 7 साठी 1500 रुपये आणि इयत्ता 8 वी साठी 2000 रुपये अशा एकूण 42 विद्यार्थ्यांना मिळून 55,500 रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पाटील मालोदे, उपसरपंच अशोक पाटील मालोदे, तसेच उपाध्यक्षा सोनिया गायकवाड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्ञानेश्वर मालोदे, लक्ष्मण कोल्हे, विठ्ठल मालोदे, सुरेश मालोदे, विलास गायकवाड, भारत गायकवाड, शिवाजी गायकवाड, दीपक गायकवाड, मुख्याध्यापक बी. डी. जाधव, तसेच शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
