“लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ”
पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने 25 जुलै 2024 रोजी निवडणुकीच्या पूर्वी महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.आणि अडीच कोटी हून अधिक महिलांनी मोठ्या आशेने या योजनेसाठी अर्ज दाखल केले व त्यातील बहुतांश महिलांनी खात्यात त्यांचा पहिला हप्ता देखील पडला होता.
निवडणुका झाल्यावर शिंदे फडणवीस सरकारच्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीला राज्यातील महिलांनी भरभरून आशीर्वाद देत जिंकून दिले. मात्र पुन्हा सत्तेवर बसत शिंदे फडणवीस सरकारला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे की काय असे दिसून येत आहे. त्याचे कारण की गेल्या अनेक दिवसांपासून रोज लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कपात करण्याचे धोरण सरकारने सुरू केलेले आहे व त्यासाठी वेगवेगळ्या अटी शर्ती या लाडक्या बहिणींवर लादत असून लाडक्या बहिणी या सावत्र बहिणी झाल्या आहे की काय असा प्रश्न आता नाव रद्द झालेल्या महिलांच्या मनात येत आहे.
आकडेवारी
(डिसेंबर 2024 मध्ये लाभार्थी संख्या 20.46 लाख इतकी होती. आजघडीला राज्यात फेब्रुवारी 2025 मध्ये 2.41 लाख महिला ह्या लाभार्थी आहे, म्हणजे एका महिन्यात शासनाने पाच लाख महिलांचे अर्ज रद्द ठरवत लाभार्थी संख्या कमी केली आहे.)
अनेक ठिकाणी ज्या महिला आहेत मोठ्या आशेने या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केला मात्र आता नवनवीन फंडे काढत राज्य सरकार या महिलांच्या लाभार्थी यादीतून नाव रद्द करणार असे वारंवार ठिकठिकाणी बैठकांमध्ये सभांमध्ये सांगत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना 2100 रुपये देण्याची मागणी एकीकडे जोर धरत असताना सरकार लाभार्थी कमी करण्यावर ठाम असल्याचे दिसून येतेय. तसेच ज्या महिलांनी या योजने साठी अर्ज दाखल करावयाचे असेल त्यांच्या साठी कुठेही सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
तर दुसरीकडे केवळ मतदानासाठीच विधानसभेच्या तोंडावर या लाडक्या बहीण वर्गांना भुलवण्यासाठी आणली आणि आता सरकार वाऱ्यावर सोडून देत भूमिका घेत असल्याने महिला वर्गात तीव्र नाराजी दिसून येत आहे.
अजूनही राज्यातील लाखो महिला या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र असताना देखील काही तांत्रिक कारणामुळे त्या या योजनेसाठी अर्ज करू शकलेले नाहीत मात्र या योजनेसाठी आठ महिने उलटून देखील गेले आहे. मात्र अद्याप पर्यंत नव्याने अर्ज दाखल करण्यासाठी किंवा त्रुटीत सुधारणा करण्यासाठी महिलांना कुठलीही संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली नाही. परिणामी अनेक महिला या नातलगात,शेजारी किंवा परिवारामध्ये एखाद्या महिलेस पैसे आले तर अर्जापासून वंचित ठरलेल्या महिलांचा हिरमोड होतो आहे त्यांचा देखील सरकारने विचार करावा. तसेच योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना राज्य सरकारने सहानुभूती दाखवून लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने अर्ज दाखल करण्याची संधी देण्याची मागणी देखील होत आहे.
– श्री. सतीश देवेंद्र लोखंडे, वेरूळकर
सामाजिक कार्यकर्ते