Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादकुर्ला डाक कार्यालयात रक्षाबंधनातून एकतेचा संदेश

कुर्ला डाक कार्यालयात रक्षाबंधनातून एकतेचा संदेश

कुर्ला डाक कार्यालयात रक्षाबंधनातून एकतेचा संदेश
देगलूर/प्रतिनिधी/  कुर्ला डाक कार्यालय,मुंबई येथे शनिवार दि.९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचे औचित्य साधत कार्यालयातील महिला डाक कर्मचारी तथा हिरकणी पुरस्कार प्राप्त शेख सलिमाबी चाँदसाब यांनी कार्यालयात कार्यरत कर्मचारीवर्गास मनगटी राखी बांधून या भावा बहिणीच्या उत्तुंग भावगर्भ रक्षाबंधनातून एकतेचा संदेश
दिला आहे.
भावा बहिणीचे निखळ प्रेम अबाधित असणारा हा राखीपौर्णिमेचा सण सबंध राज्यभर व भारतभर गणला जातो.प्रत्येक घराघरांत या सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व राहिले आहे.याच सणानिमित्त मुंबई शहरातील डाक विभागात कार्यरत असताना थोडीसी उसंत घेऊन महिला कर्मचारी शेख सलिमाबी चाँदसाब यांनी रक्षाबंधनानिमित्त तेथील कर्मचारीवर्गास राखी बांधून एकतेचा,एकात्मतेचा सबंध राज्यभर संदेश दिला आहे.सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments