Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादकुंभार समाजाच्या अभिमानाचा दिवस : संत गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा संपन्न

कुंभार समाजाच्या अभिमानाचा दिवस : संत गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा संपन्न

कुंभार समाजाच्या अभिमानाचा दिवस : संत गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा संपन्न

 

खुलताबाद/ प्रतिनिधी /संत गोरोबाकाका यांच्या ७०८व्या पुण्यतिथीनिमित्त पळसवाडी गावात गंगामाई आश्रम येथे कुंभार भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रम संपन्न झाला. कुंभार समाज बांधवांनी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या दिवशी गोरोबाकाकांना अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात गोरोबाकाकांच्या प्रतिमेची पूजा व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ढवळेश्वर संस्थान देभेगावचे मठाधिपती ह.भ.प. ज्ञानदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
संध्याकाळी सात वाजता ह.भ.प. दगू महाराज ठेंगडे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची शोभा वाढली.त्यांनी आपल्या कीर्तनातून संत गोरोबाकाकांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकताना त्यांच्या पांडुरंगभक्तीचे विलक्षण उदाहरणे देऊन भक्तीमय केले. गोरोबाकाकांनी आपल्या भक्तीत एवढी तल्लीनता साधली होती की, त्यांनी स्वतःच्या मुलालाही भक्तीच्या वेडेपणात चिखलात तुडवले होते. दोन्ही हात गमावले असतानाही पांडुरंगाने स्वतः प्रकट होऊन त्यांच्या हातून मडकी व गाडगी घडवली, अशी भावस्पर्शी कथा त्यांनी सांगितली.या प्रसंगी स्वाभिमानी कुंभार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर जाधव, बाबुराव देवरे, सुभाष देवरे, संजय देवरे, सुदाम देवरे, प्रकाश ठेंगडे,रमेश ठेंगडे, मच्छिंद्र ठेंगडे, नारायण बर्डे, रामदास ठेगडे, अजिनाथ  ठेंगडे,  संतोष औटे,राजाराम ठेंगडे,धोंडीबा ठेंगडे यांचे सह मोठ्या संख्येने  ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता हरिपाठ व महाप्रसादाने झाली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments