खुलताबादमध्ये ईद-उल-फित्रची नमाज सकाळी ८-३० वाजता ईदगाहवर आणि ९ वाजता दर्गा बाबा बुरहानवर
ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी शनिवारी सहा वाजेच्या सुमारास खुलताबाद येथे ईदगा मैदानावर जाऊन ईदगाह परिसराची पहाणी केली यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे होते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक यांनी ईदगाह परिसराचे पहाणी केली
खुलताबाद: प्रतिनिधी खुलताबाद शहरात ईद-उल-फित्रच्या नमाजची तयारी पूर्ण झाली आहे.रुईत-ए- हिलाल कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या माहिती नुसार, ईदगाहवर सकाळी ८३० वाजता आणि दर्गा बाबा बुरहान येथे ९ वाजता नमाज अदा करण्यात येणार आहे.या संदर्भात दर्गा बुरहानोद्दीन गरीब रह. येथे रुईत-ए-हिलाल कमिटीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीला दर्गा कमिटी हद्दे कला, हद्दे खुर्द, हद्दे सुव्वमचे सर्व पदाधिकारी, सर्व जमातींचे इमाम,मुफ्ती, तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.बैठकीत झालेल्या निर्णया नुसार, हाफिज मोहम्मद याह्या हे ईदगाहवर सकाळी ८३० वाजता नमाज अदा करतील त्यानंतर ९ वाजता दर्गा बाबा बुरहान येथेही हाफिज युसुफ नमाज अदा करणार आहेत.यावेळी मुफ्ती मोहम्मद मोहसिन, हाफिज युसूफ,हाफिज इजहार, हाफिज जावेद,हाफिज निसार,मुफ्ती मोहम्मद शफी,माजी नगराध्यक्ष अँड.एस.एम.कमर, मुनीबोद्दीन,रईस जागीरदार, इमरान जागीरदार,मकसूद अली कादरी, मुबशिरोद्दीन,कबीर मुल्ला,हबीब टेलर, सालेह मोहम्मद,फकीर कुरैशी,सुलतान अहमद, लियाकत अहमद, अब्दुल रशीद कुरैशी, शेख इस्माईल,मोहम्मद गयास आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या अखेरीस हाफिज याह्या यांनी विशेष दुआ केली. कार्यक्रमाचे आभार एजाज अहमद यांनी मानले.नागरिकांना आवाहन शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी वेळेवर उपस्थित राहून नमाज अदा करावी आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. नमाज नंतर देशातील शांतता,सलोखा आणि बंधुत्वासाठी विशेष प्रार्थना करण्यात येणार आहे.
ईदगाहच्या परिसरात जमिनीवर भू माफियाचे डोळे.
खुलताबाद येथील ईदगाहच्या जमिनीवर
काहीक भूमाफियाच्या डोळे या परिसरात जमिनी हडपणाचे डाव असल्याचे चर्चा खुलताबाद शहरात अनेक नागरिक करताना दिसत आहे..
दोन्ही कमिट्यांनी ईदची नमाज वेळ जाहीर केल्याने खुलताबाद शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एकमेकांवर जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप लावले जात असून, दोन्ही कमिट्या बरखास्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे..

