Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादखुलताबाद येथे ईदगाह मैदानावर रमजान ईद ईद-उल-फित्र  उत्साहात साजरी

खुलताबाद येथे ईदगाह मैदानावर रमजान ईद ईद-उल-फित्र  उत्साहात साजरी

खुलताबाद येथे ईदगाह मैदानावर रमजान ईद ईद-उल-फित्र  उत्साहात साजरी

हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आले…

खुलताबाद /प्रतिनिधी /खुलताबाद शहर व परिसरात सोमवारी आज रमजान ईद ईद-उल-फित्र  उत्साहात साजरी केली गेली रमजान ईद निमित्त खुलताबाद येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. सकाळी साडे साडेआठ च्या सुमारास हाफिज  मोहम्मद याह्या यांनी नमाज पठण केले.
तसेच खुलताबाद शहरातील दर्गा हजरत ख्वाजा शेख बहानोद्दीन गरीब रह. येथे देखील रमजान ईद ची सकाळी  नऊ वाजता नमाज हाफिज सय्यद युसुफ  यांनी नमाज पठण केले. यानं तर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे या दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेत ग्रामीण पोलिस अधीक्षक विनय कुमार राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड. पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह परिसरात चौख पोलीस बंदोबस्त लावण्यात आले होते राज्य राखीव दल पथक.व स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्या   सह मोठा पोलीस फोर्स तैनात करण्यात आले होते.
शीरखुर्मा चवीला तर उत्तम असतोच पण आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे त्याचा आस्वाद नक्की घ्या.  आमदार प्रशांत बंब यंदा गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन्ही मोठे सण अगदी लागोपाठ आले आहेत. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. कोणताही सण म्हटला की त्याचा एक पारंपरिक पदार्थ ठरलेला असतो. जसं की गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड- पुरीला महत्त्व आहे तर रमजान ईदच्या दिवशी शीरखुर्म्याशिवाय रमजान ईद नाहीच.. त्यामुळे खवय्यांना दोन दिवस दोन उत्तम पदार्थांची मेजवानी मिळाले आहे असे आमदार प्रशांत बंब यांनी या ईद मिलन कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले
ईद-उल-फित्र रमजान ईदचा उत्साह खुलताबाद शहरात नमाज पाठण मुस्लिम बांधवांची पहाटे पासून ईदगाह मैदानावर गर्दी झाली होती.रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शिरखुर्रमा वाटपाचा कार्यक्रम झाला.शिरखुर्रमा
खुलताबादकरांनी सौहार्द राखले -विनय कुमार राठोड ईद मिलन कार्यक्रमात सहभाग
खुलताबाद करांनी  आपली शांततेची परंपरा कायम राखत सोमवारी ईद उल फित्रचा रमजान ईद या सण उत्साहात साजरा केला.विविध जाती-धर्मांतील नागरिकांनी एकत्र येऊन सौहार्दाचे दर्शन घडवले. या आनंदमय वातावरणात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये पोलिस अधीक्षक डॉ.विनय कुमार राठोड यांनी विशेष उपस्थिती लावली.
माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन आणि दर्गा कमिटी हद्दे खुर्दचे अध्यक्ष शरफोद्दीन मोहम्मद रमजानी यांनी पोलीस अधीक्षक यांना रमजान ईद ची निमित्ताने निमंत्रण केले होते यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.त्यांनी नागरिकांशी संवाद साधत ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाहमध्ये सकाळी मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली आणि देशाच्या शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर नागरिकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आपुलकीचा संदेश दिला.ईद मिलन कार्यक्रमात पोलिस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड, उप विभागीय पोलिस अधिकारी विजय कुमार ठाकुरवाड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, आमदार प्रशांत बंब यांच्यासह विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.माजी नगराध्यक्ष एड. कैसरोद्दीन यांनी ईद मिलन कार्यक्रमात बोलताना सांगितले की, देशभरात औरंगजेबाची कबरी वाद देशभरात चर्चा सुरू असली तरी खुलताबाद करांनी  नेहमीच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण घडवले आहे. जातीवादी विचारांना फाटा देत येथील नागरिक सौहार्दाने सण साजरे करतात.प्रशासनाने या हिंदू मुस्लिम एकोपीचे  आदर्श शासना पर्यंत पोहोचवावा आणि इतरांनी ही याचा प्रेरणादायी आदर्श घ्यावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी ग्रामीण पोलीस अधीक्षक  राठोड यांनी सांगितले, “खुलताबादच्या नागरिकांनी शांततेची आणि बंधुत्वाची परंपरा कायम राखली आहे. जाती-धर्माच्या भिंती ओलांडून त्यांनी एकोप्याचा संदेश दिला आहे, यासाठी मी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. नागरिकांच्या संयम आणि सामंजस्यामुळे संपूर्ण सण शांततेत पार पडला.सदर कार्यक्रमाने सर्व समाज बांधवांनी  सामाजिक ऐक्याचा संदेश दिला असून, खुलताबादकरांनी पुन्हा एकदा सौहार्दाचे दर्शन घडवले आहे. यावेळी  आमदार प्रशांत बंब, पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे,शिवसेना उबाठाचे नेते कृष्णा पाटिल डोणगावकर,कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटिल डोणगावकर,भद्रा मारुती देवस्थानचे अध्यक्ष मिठु पाटील बारगळ,माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ,भाजपा शहराध्यक्ष परसराम बारगळ,माजी नगरसेवक योगेश बारगळ माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, मुनीबोद्दीन, निसार अहेमद,विलास  चव्हाण, शाजेब अहेमद, एजाज अहेमद रईस जागीरदार मोहम्मद नईम बक्ष सलेह मोहम्मद, अनवरोद्दीन,फकीर मोहम्मद कुरैशी यांच्यासह खुलताबाद शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments