कुक्कडगांव ग्रामपंचायत कार्यालय बनलं ‘फक्त शोभेची वस्तू’! – खरा कारभार खाजगी खोलीतून
कुक्कडगांव/ता. अंबड/जि. जालना/ ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे गावच्या विकासाचे केंद्रस्थान… पण कुक्कडगांवमधील ग्रामपंचायत कार्यालय फक्त जयंत्या साजऱ्या करण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. वास्तव असा आहे की कारभार मात्र अंबडमधील एका खाजगी खोलीतून चालवला जातो – हे उघड झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गावात आहे कार्यालय – पण कामे खाजगी खोलीत!
कुक्कडगांव ग्रामपंचायतीचे अधिकृत कार्यालय गावात असले तरी, त्यामध्ये कोणतेही शासकीय व्यवहार होत नाहीत.तसेच ग्रामपंचायत चे सर्व रेकॉर्ड ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नसल्याचे निदर्शनास आले आहे,रोजच्या कामकाजासाठी सचिव, सरपंच, कर्मचाऱ्यांना अंबडमधील एका खाजगी कार्यालयाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या कामांना खोळंबा येतो आहे.
महापुरुषांच्या जयंत्या आणि खर्च मात्र भरघोस!
ग्रामपंचायत कार्यालयात फक्त महापुरुषांच्या जयंत्या, हार-फुले आणि फोटो लावण्यापुरते कार्यक्रमच होतात. त्यासाठी शासकीय निधी खर्च केला जातो. मात्र खऱ्या अर्थाने लोकसेवेचे कोणतेही काम या इमारतीत होत नाही.
शासनाच्या निधीचा चुकीचा वापर?
या कार्यालयाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी व इतर खर्चासाठी दरवर्षी लाखो रुपये शासकीय निधी दिला जातो. मात्र, या निधीचा प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या सोयीसाठी वापर होताना दिसत नाही. हा प्रकार म्हणजे शासकीय निधीचा अपवापरच मानला जातो, अशी जोरदार टीका ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामस्थांची मागणी –
ग्रामपंचायत कार्यालयात नियमितपणे शासकीय कामकाज व्हावे
अंबडमधील खाजगी जागेतील अनधिकृत व्यवहार थांबवावेत
निधीचा योग्य वापर करावा व चौकशी करण्यात यावी
ग्रामपंचायत कार्यालयाला खऱ्या अर्थाने कार्यरत केंद्र बनवावे