Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबाद‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘कृषी क्षेत्र’ नव्या परिवर्तनाच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘कृषी क्षेत्र’ नव्या परिवर्तनाच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘कृषी क्षेत्र’ नव्या परिवर्तनाच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 11: आजचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते. तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या साधनांना भौगोलिक सीमा नाहीत त्यामुळे श्रीमंत-गरीब, जाती, भाषा असा फरक करत नाही. म्हणूनच हे तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयांच्या कल्पनांना आकार देऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एचपी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एचपी ड्रीम अनलॉक्ड’ या उत्सवाचे मेहबुब स्टुडिओ, वांद्रे येथे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाला एचपी इंडिया च्या  व्यवस्थापकीय संचालिका इप्सिता दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, विपणन प्रमुख आकाश भाटिया, कायदेशीर व शासकीय व्यवहार विभाग प्रमुख राजू नायर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासनाने आता एआय स्वीकारण्याचे धोरण सुरू केले आहे. हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले असून यात प्रत्येक जण आपल्या कल्पनांना वास्तवात आणू शकणार आहे. शासनाने एचपी सोबत डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले असून आता आणखी पुढे जाऊन सर्वसामान्यांना नव्या तंत्रज्ञानांचा, विशेषतः AI चा, सहज प्रवेश मिळावा यासाठी भागीदारीचा आराखडा तयार करण्याचे ठरवले आहे. कृषी क्षेत्रातही AI चा वापर सुरू केला आहे. पुण्यात झालेल्या अ‍ॅग्री-हॅकथॉनमध्ये तरुणांनी तयार केलेले AI मॉडेल हे हवेतील घटकांचे विश्लेषण करून पिकावर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आणि सर्तक करते. हे खरोखरच गेम-चेंजर मॉडेल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments