Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादगंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी भवनाचे काम निकृष्ट दर्जाचे - चर्चेला...

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी भवनाचे काम निकृष्ट दर्जाचे – चर्चेला उधान

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी भवनाचे काम निकृष्ट दर्जाचे – चर्चेला उधान

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/ गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील काही दिवसापासून शेतकरी भवनाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याची चर्चा गंगापूर शहरांमध्ये सुरू झाली आहे.
गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना ये – जा करण्यासाठी रस्त्याची देखील व्यवस्था खूपच खराब झालेली होती पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये  येण्यासाठी मोठी कसरत  करावा लागत होती. परंतु आता सध्या रस्त्याचे काम व तसेच शेतकरी भावनाचे काम या ठिकाणी सुरू आहे. परंतु हे काम अंदाज पत्रकानुसार होत नसल्याची चर्चा आहे. तसेच काही दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्याकडे सविस्तर या कामाची माहिती मागण्यांसाठी दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे प्रतिनिधी वेळोवेळी प्रयत्न करत आहे. परंतु सचिव हे सदर माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. काही दिवसांपूर्वी दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे प्रतिनिधी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्याशी संपर्क करून त्यांना विचारणा केली असता सदर कामाच्या संदर्भात त्यांनी माहिती मागितली असता तर सचिव यांनी सांगितले की हो तुम्हाला माहिती देतो. सभापती यांना बोलून सविस्तर चर्चा करून तुम्हाला कामासंदर्भात सविस्तर माहिती देतो. परंतु सचिव यांचे माहिती देण्यास टाळाटाळ करण्याच्या मागे कारण काय आपले पितळ उघडे होण्याच्या भीतीपोटी माहिती देण्यात येत नाही का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. सदरील हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे सचिव व सभापती यांच्या संगतमताने  संबंधित ठेकेदाराला पाठीमागे घालण्याचे काम करत असल्याचीही चर्चा आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments