जिल्हा क्रीडा अधिकारी यांची चौकशी करुन निलंबीत करा; केलेल्या कामाचे पैसे दिले नसल्याने आत्मदहन करणार – इस्माईल उस्मान शेख
जालना/ जिल्हा क्रीडा अधिकारी हे जालना येथे कार्यरत झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या कार्यालयाच्या विकास कामात मोठ्या प्रमाणात घोटाळ करीत असून त्यात एका ठेकेदाराने केलेल्या कामाचे पैसे देखील दिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळे आली असून ते येणार्या दोन दिवसात पोलीसांना माहिती देऊन आत्मदहन करणार असल्याचा इशारा काम करणारे इस्माईल उस्मान शेख यांनी दिला आहे.
जालना येथील जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांनी इस्माईल शेख यांच्याकडून कागदपत्राची पुर्तता करुन घेत रंगरंगोटी आणि इलेक्ट्रीक कामाचे टेंडर देतो असे सांगून फाईल तयार केली. त्यानंतर इमारतीची रंगरंगोटी करुन घेतली व इलेक्ट्रीकलचे कामही करुन घेतले. क्रीडा कार्यालयाच्या कामाचा ठेका मिळाल्याने खूश झालेल्या इस्माइल शेख यांनी बील सादर केले. मात्र त्यांच्या नावे बील न काढता छत्रपती संभाजी नगर येथील संजय गाडवे यांच्या ओळखीच्या मित्राच्या नावावरच बील काढून पैसे उचलून घेतले असल्याचा आरोप इस्माईल शेख यांनी केला आहे. संजय गाढवे यांनी रंगरंगोटीचे 3 लिफाफे मागवून घेतले. त्यानंतर टेंडर मंजूर केले असल्याचे सांगून ती फाईल इस्माईल यांना दाखविण्यात आली. त्यामुळे इस्माईल यांनी रंगरंगोटी आणि इलेक्ट्रीकलचे काम करुन दिले. त्यानंतर बीलाची मागणी केली असता क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांनी टाळाटाळ करुन बील दिले नाही. त्यामुळे इस्माईल शेख यांनी त्यांच्या कार्यालयात जावून विचारपुस केली असता त्यांनी सदरील बील हे छत्रपती संभाजी नगर येथील एका एजन्सीच्या नावे काढून घेतले असल्याचे दिसून आले. त्यामुळे संजय गाढवे यांनी इस्माईल शेख यांना कमी रकमेचे टेंडर मंजूर करुन ते त्यांच्या मित्राच्या नावे परस्पर मंजूर करुन त्याचे बील काढून घेतले. वस्तुस्थितीमध्ये शेख इस्माईल यांनी भरलेले टेंडर कमी रकमेचे असून गाढवे यांच्या मित्राच्या नावे काढलेले बील हे जास्तीचे आहे. त्यामुळे संजय गाढवे यांनी इस्माईल शेख यांची फसवणूक करुन शासनाच्या तिजोरीतून स्वतःच्या फायद्यासाठी रक्कम हडप केल्याचा आरोप इस्माईल शेख यांनी केला आहे. त्यामुळे गाढवे यांनी मंगळवार पर्यंत केलेल्या कामाचे पैसे न दिल्यास गुरुवारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा इस्माईल शेख यांनी दिला आहे.
