कन्नड न.परिषदेच्या वजाबाकी आकडेमोडीत समर्थकांची दमछाक
कन्नड :- निवडणूक तर पार पडली पण मा.न्यायालयाचे निर्णयाने मात्र निकालाची तारीख चक्क17ते 18 दिवस दिवस लांबल्याने समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
कन्नड नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपा – राष्ट्रवादी,शिवसेना शिंदे गट तथा काँग्रेस पक्षाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठतेची करून तिन्हीही पक्षाने आप आपल्या पक्षांच्या नेत्यांना शहरात आणून मतदार राजांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा मोठा प्रयत्न केला.व शहरात मोठे वातावरणही तयार केले.ठरल्या प्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार न घडता निवडणूक निर्वाचित आयोगाचे अधिकारी व स्थानिक प्रशासनाने त्यात सहभाग घेऊन आपल्या परीने यथायोग्य कार्य पूर्णतःवास नेले.पोलीस दलानेही कुठल्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडणार नाही.यासाठी चोक बंदोबस्त दिला.शहरात एकूण- 37 हजार 780 मतदारापैकी एकूण – 29 हजार 27 – मतदारांनी आपला मतदानचा हक्क बजावला यानुसार या मतदानाची ऐकून आकडेवारी ही 76.93 टक्के झाली.पण सायंकाळचे सुमारास मा.न्यायालयाचे आदेशाप्रमाणे सदर पार पडलेल्या निवडणुकीचा अंतिम निकाल हा 21 डिसेंबर रोजी म्हणजे चक्क 17 ते 18 दिवस पुढे गेल्यामुळे प्रत्येक पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी निराशा झाल्याचे दिसून आले.सद्या प्रत्येक पक्षाचे समर्थक आप आपल्या बुद्धिजीवी प्रमाणे आकडेमोडीत गुंग असुन राष्ट्रवादी काँग्रेस – भाजपायुती किती मते घेईल शिवसेना शिंदे गट किती मते घेईल.यावर काँग्रेस पक्षाचे समर्थक आकडेमोड करीत असुन शिवसेना शिंदे गटाचे समर्थक काँग्रेसपक्ष – राष्ट्रवादी – भाजपा युतीचे किती मतदान कापतील यावर आकडेमोड करतांना दिसत आहे.मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी – भाजप युतीस शिवसेना शिंदे गट यांना लाडक्या बहिणी,भाऊ,जेस्ट नागरीक तसेच लाडके शेतकरी कशी साथ देतात,की,त्यांना झुगारतात यावरच या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे असे दिसते.ते आता अंतिम 21 तारखेच्या निकालानंतरच स्पस्ट होणार आहे.तोपर्यंत सर्व उमेदवारांचा जीव टांगणीला लटकलेला असेल हे निश्चित.